Thursday, April 21, 2022
Great Aaushadh Haritaki for all Disease
Wednesday, April 20, 2022
જેના કંઠમાં શ્રીરામનું નામ હોય
Sunday, April 17, 2022
3_ इदं पुरुषोत्तममासमाहात्म्यम्
3_ इदं पुरुषोत्तममासमाहात्म्यम्
युगांमध्ये एकाने केलेले पुण्य अथवा पाप सर्वांना बाधक होत असे पण या कलियुगामध्ये तशी स्थिति नमून पुण्य
अथवा पापाचे फल कालाच मिळते व म्हणूनच ही स्थिति दाखविण्याकरतां आपण स्वतः तपश्चर्या करीत आहात.
॥१४॥हे भगवंता ! सर्व प्राण्यांचे मन विषयामध्ये आसक्त झाले आहे, ते बायकामुले व घरै दारे यांच्यामध्ये गढून गेले
लिप्यते पुण्यपापाभ्यामिति ते तपसि स्थितिः॥भगवन् प्राणिनः सर्वे विषयासक्तमानसाः
॥१५॥दारापत्यगृहासक्तास्तेषां हितकरं च यत्।ममापि हितकृत्किचिदिचार्य शंतुमर्हसि।।
त्वन्मुखाच्छोतुकामोहं ब्रह्मलोकादिहागतः॥१६॥उपकारपियो विष्णुरिति वेदे विनिश्चितम्
॥१७॥ तस्माल्लोकोपकाराय कथासारं वदाधुना॥ तस्य श्रवणमात्रेण निर्भयं विन्दते पदम्
॥ १८॥ नारदस्य वचः श्रुत्वा प्रहस्य भगवानृषिः ॥ कथां कथितुमारेभे पुण्यां भुवन-
पावनीम् ॥ १९॥
आहेत; तेव्हां त्यांचेकरितां काही हितकर व मलाहि हितकर असे विचार तुमचे मुखांतून श्रवण करण्याकरिता
ब्रह्मलोकापासून मी येथे आलो आहे, क्षमा करा ! ॥ १५ ॥ १६ ॥ भगवान् विष्णूला परोपकार प्रिय आहे असे वेदां-
मध्ये सांगितले आहे, तर परोपकाराकरितां एकादी सारभृत अशी कथा आम्हाला सांगा. जी कथा ऐकली असतां
निर्भय असें मोक्षपद प्राप्त व्हावें ॥१७॥१८॥ सूत म्हणतात, याप्रमाणे नारदाचे भाषण श्रवण करून भगवान् नारायण-
<<
ऋषी हसले व त्यांनी सर्व जगाला पावन करणारी अशी पुण्यकारक कथा सांगण्याला आरंभ केला ॥ १९ ॥ नारायण
म्हणतात नारदा ! गोपस्त्रियांचे मुखकमलावरील भ्रमर, रासाधिपति, रसिकजनांचा अलंकार, वृन्दावनामध्ये
संचार करणारा असा जो व्रजाधिपति श्रीकृष्ण भगवान् त्याच्या पुण्यकथा सांगतो, तुं श्रवण कर ॥२०॥ वत्सा! ज्या
श्रीनारायण उवाच ॥ गोपाङ्गनावदनपङ्कजषट्पदस्य रासेश्वरस्य रसिकाभरणस्य पुंसः॥
वृन्दावने विहरतो ब्रजभर्तुरादेः पुण्यां कथां भगवतः शृणु नारद त्वम्॥२०॥चक्षुनिमेषप-
तितोजगतां विधाता तत्कर्म वत्स कथितुंभुविकः समर्थः। त्वं चापि नारदमुने भगवच्चरित्रं
जानासि सारसरसं वचसामगम्यम् ॥ २१॥ तथापि वक्ष्ये पुरुषोत्तमस्य माहात्म्यमत्यद्भुत-
मादरेण ॥ दारिद्यवैधव्यहरं यशस्य सत्पुत्रदं मोक्षदमाशुसेव्यम् ॥ २२॥ नारद उवाच ॥
पुरुषोत्तमस्तु को देवो माहात्म्यं तस्य किं मुने॥॥अत्यद्भुतमिवाभाति विस्तरेण वदस्य मे ॥२३॥
भगवंताच्या एक निमिषामध्ये एक ब्रह्मदेव होऊन जातो, अशा भगवंताच्या कथा वर्णन करण्यास पृथ्वीवर कोण
समर्थ आहे ? हे नारद मुने ! वाणीला अगम्य व सारांतील सार असें भगवचरित्र आहे हे तुं जाणत आहेसच ॥ २१ ॥
तथापि दारिद्य व वैधव्यपण नाहीसे करणारे, यश देणारे, सुपुत्रदायक, मोक्ष देणारे व शीघसेव्य असें पुरुषोत्तमाचे
अत्यद्भुत माहात्म्य तुला मोठ्या आदराने सांगतों ऐक ॥ २२ ॥ नारद म्हणतात, हे मुने, पुरुषोत्तम हा देव
37
कोणचा व त्याचे माहात्म्य काय ? ही गोष्ट मला फार अद्भुत वाटते. तेव्हां ती सविस्तर मला सांगा ॥ २३ ॥
मत म्हणतात, हे ऋपिहो ! याप्रमाणे नारायण मुनीनी नारदाचे भाषण श्रवण करून एक गुहूर्त पुरुषोत्तम देवाचे
ध्यान करून कथा सांगण्यास प्रारंभ केला ॥ २४ ॥ श्रीनारायण म्हणतात, हे नारदा ! पुरुषोत्तम हैं नाव एका
सूत उवाच॥ नारदोक्तं वचः श्रुत्वा मुनिारायणोऽब्रवीत् ॥ समाधाय मनः सम्यक् मुहूर्त
पुरुषोत्तमम्॥२४॥श्रीनारायण उवाच॥ पुरुषोत्तमेति मासस्य नामाप्यस्ति सहेतुकम् ॥ तस्य
स्वामी कृपासिन्धुः पुरुषोत्तम उच्यते॥२५॥ ऋपिभिः प्रोच्यते तस्मान्मासः श्रीपुरुषोत्तमः
॥ तस्य व्रतविधानेन प्रीतः स्यात्पुरुषोत्तमः॥ २६ ॥ नारद उवाच ॥॥ सन्ति मधादयो
मासाः से धरास्ते श्रुतामया॥तन्मध्ये न श्रुनोमासः पुरुषोत्तमसंज्ञकः ॥२७॥ पुरुषोत्तमस्तु
को मासस्तस्य स्वामी कृपानिधिः ॥ पुरुषोत्तमः कथं जातस्तन्मे हि कृपानिये ॥२८ ॥
महिन्याचे सकारण असे आहे. कारण, त्या महिन्याचा स्वामी कृपासिंधु गुरुपोचम आहे ।। २५ ।। म्हणूनच ऋपीनी
या महिन्याला पुरुषोत्तममास असे म्हटले आहे. या पुरुषोत्तम महिन्यांनील ते यथाविधी केली असता
पुरुषोत्तम देव प्रसन्न होतात ॥२६॥ नारद म्हणतात, मी चैत्रादि महिने व त्यांच्या माधवादि देवताहि श्रवण केल्या
आहेत, पण त्यांमध्ये पुरुषोत्तम या नांवाचा महिना कांहीं ऐकिला नाहीं ॥२७ ॥ हे दयानिधे ! पुरुषोत्तम नांवाचा
महिना कोणचा व कृपानिधि पुरुषोत्तम त्याचा स्वामी कसा झाला हे मला सांगा ॥२८॥ हे प्रभो ! त्या महिन्याचे
स्वरूप विधिपूर्वक मला सांगा. त्या महिन्यामध्ये कोणती कृत्ये करावीत, स्नान कसे करावे व दान काय करावें।।२९।।
पुरुषोत्तममासांत जप,पूजा व उपवासादि साधने काय काय आहेत, कोणते कृत्य केले असतां कोणता देव संतुष्ट होतो
स्वरूपं तस्य मासस्य सविधानं वद प्रभो॥ किं कर्तव्यं कथं स्नानं किं दानं तत्रसत्पते॥२९॥
जपपूजोपवासादिसाधनं किंच भण्यताम् ॥ तुष्येत्कृतेन को देवः किं फलं वा प्रयच्छति॥३०॥
एतदन्यच्च यत्किंचित्तत्वं ब्रूहि तपोधन ॥अनापृष्टमपि ब्युः साधवो दीनवत्सलाः॥३१॥
नरा ये भुवि जायन्ते परभाग्यानुवर्तिनः ॥दारिद्रयपीडिता नित्यं रोगिणः पुत्रकांक्षिणः
॥३२॥जडा मूका दाम्भिकाश्च हीनविद्याः कुचैलिनः ॥ नास्तिका लम्पटानीचा जर्जराः
परसेविनः ॥ ३३॥
व फल काय देतो तेही मला सांगा।।३०।। हे तपोधना! मी विचारलेले व याहून काही विचारावयाचे राहिले असेल तर
ने मला सांगा. कारण, दीनवत्सल साधु विचारल्याशिवायहि सांगतात ।। ३१ ।। जे कोणी मनुष्य, आपल्या कर्माने
दुसऱ्याचे भाग्यावर जीवन पावणारे, दरिद्री, नित्य रोगाने पीडित, पुत्राची इच्छा करणारे ।। ३२ ॥ बुद्धिमंद,
7
मुके, दांभिक, विद्याहीन, मलीन वस्त्र धारण करणारे, नास्तिक, परदारालंपट, नीच, दुःखी, दुसऱ्याचे
सेवक ॥ ३३ ॥ निराश, ज्यांची कोणतीच गोष्ट सिद्धीस जात नाही, धैर्य विगलित, कुरूप, रोगी, व्यंग,
आंधळे ॥ ३४ ॥ कोणी आपल्या इष्टमित्रांशी, स्त्रियेशी व आईबापाशी वियोग पावलेले, कोणी शोकाने व
दुःखाने कृश झालेले व कोणाला त्यांची इष्ट वस्तु केव्हांच मिळत नाही असे उत्पन्न होतात ॥ ३५ ॥ हे प्रभो
नष्टाशा भमसंकल्पाः क्षीणसत्वाः कुरूपिणः ॥ रोगिणः कुष्ठिनो व्यङ्गा नेत्रहीनाश्च केचन
॥३४॥ इष्टमित्रकलत्राप्तपितृमातृवियोगिनः॥शोकदुःखादिशुष्काङ्गाः स्वेष्टवस्तुविवर्जिताः
॥३५॥ पुन वंविधास्ते स्युर्यत्कृतेन श्रुतेन च ॥ पठितेनानुचर्णिन तद्वदस्व मम
प्रभो ॥ ३६ ॥ वैधव्यवन्ध्यतादोपहीनाङ्गत्वदुराधयः ॥ रक्तपित्ताद्यपस्मारराजय-
क्ष्मादयश्च ये ॥३७॥
अशा लोकांनी कोणते एक कर्म केल्याने किंवा श्रवणाने अथवा पठणाने अथवा आचरणाने त्यांना अशी दोन
होतील तसे मला सांगा ॥ ३६ ॥ हे जगन्नाथा ! वैधव्य, वांझपण, व्यंगत्व, मानसिक दुःखें, रक्तपित्त, अपस्मार
क्षय इत्यादि रोगांनी व दुःखसमुदायांनी पीडित झालेल्या मनुष्यांना पाहून मी अतिशय दुःखी झालो आहे.
हे प्रभो ! आपण सर्वज्ञ आहां व सर्वसत्वांचे निधान आहां, करितां माझ्यावर दया करून माझ्या मनाला आनंद होईल
2
असें कथानक मला विस्ताराने सांगा ॥ ३७ । ३८ । ३९ ॥ सूत म्हणतात-याप्रमाणे विधितनय नारदाचे, जगाला
हितकारक असें रसभरित भाषण श्रवण करून नारायणांनी चंद्राप्रमाणे शांत अशा नारदाचे अभिनंदन केले व नवीन
एतैर्दोपसमूहैश्च दुःखितान वीक्ष्य मानवान् ॥ दुःखितोऽस्म जगन्नाथ कृपां कृत्वा ममोपरि
॥३८॥ विस्तरेण वद ब्रह्मन् मन्मनोमोदहेतुकम् ।। सर्वज्ञः सर्वतत्वानां निधानं त्वमसि प्रभो
॥३९॥ सूत उवाच॥॥इति विधितनयोदितं रसालं जनहितहेतु निशम्य देवदेवः॥अभिनव-
घनरावरम्यवाचाऽवददभिपूज्य मुनि सुधांशुशान्तम्॥४०॥इतिश्रीबृहन्नारदीये पुरुषोत्तम-
माहात्म्ये श्रीनारायणनारदसंवादे प्रश्नविधिर्नाम द्वितीयोऽध्यायः ॥२॥ 11 11 11
मेघाच्या गर्जनेप्रमाणे गंभीर अशा रम्य वाणीने नारायण प्रापि बोलू लागले ॥ १०॥ इति श्री बृहमारदीये
पुरुषोत्तम माहात्म्ये श्रीनारायण नारदसंवादे प्रश्नविधिर्नाम द्वितीयोध्यायः
||Jay Shree Ram Aum||